Views



*माजी सरपंच कै.बळीराम माळी यांच्या 11 व्या पुण्यतिथी निमित्त माळी कुटुंबीयांच्या वतीने सामाजिक भावना जपत लोहारा शहरातील प्रभाग क्रं.10 व 14 मधील सर्व कुटुंबाना किराणा किट व मास्क, सॅनेटाईझर वाटप*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


कोरोनाचा प्रादुर्भाव लोहारा शहरात व तालुक्यात वाढत आहे. गेल्या वर्षभरापासून सतत लॉकडाऊन मुळे गोरगरीब लोकांना कामे नसल्याने यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी सरपंच कै.बळीराम विश्वनाथ माळी यांच्या 11 व्या पुण्यतिथी निमित्त अविनाश माळी व श्रीनिवास माळी यांच्या सामाजिक भावना जपत लोहारा शहरातील प्रभाग क्रं.10 व 14 मधील सर्व कुटुंबांना किराणा किट यामध्ये साखर, शेंगदाणे, गोड तेल पॉकिट, तुरदाळ, हरभराळ दाळ, रवा, गुळ, व्हील साबुन, मीठ, वाटप करण्यात आले. व तसेच मास्क, सॅनेटाईझरही वाटप करण्यात आले. कै.बळीराम माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त माळी कुटुंबीयांच्यावतीने प्रत्येक वर्षी लोहारा शहरातील नागरिकांना भोजणाचा कार्यक्रम घेण्यात येत होता. यावर्षी कोरोणाच्या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन किराणा किट वाटप केल्याने सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. यावेळी दत्तात्रय बिराजदार, काशिनाथ स्वामी, युवराज भरारे, प्रकाश चिकटे, गोरख लोखंडे, दालीप येलोरे, दिलीप पाटील, सतीश माळी, दीपक रोडगे, श्रीशैल स्वामी, शिवमुर्ती मुळे, उमाकांत भरारे, निळकंठ कांबळे, इकबाल मुल्ला, सिद्धू जाधव, राजू माळी, अमोल माळी, बजरंग बली, कांत माळी, आदिनाथ माळी, बालाजी माळी, कालीदास माळी, अनिरुद्ध जोशी, लहु कुंभार, शुभम महामुनी, शिवाजी गोरे, आदि, उपस्थित होते.
 
Top