*कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असलेल्या धानुरी गावास आ.ज्ञानराज चौगुले यांनी भेट देवुन ग्रामस्थांशी संवाद साधून सद्यस्थितीचा आढावा घेतला*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
लोहारा तालुक्यातील धानूरी गावात मागील कांही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आ.ज्ञानराज चौगुले यांनी गावास भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून सद्यस्थितीचा आढावा घेतला. गावात जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या करण्यासाठी आरोग्य विभागाच्या 4 स्वतंत्र्य टीम नियुक्त करून वार्डनिहाय काम करावे, गावातील अवैध धंदे हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्यानेही रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने अवैध धंदे चालकांवर कठोर कारवाई करावी, अशा सूचना केल्या. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता सतत मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, विशेषतः लहान बालकांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केले. येत्या 2 दिवसांत धानुरी गावात 30 बेडचे विलगिकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय यावेळी झाला. यावेळी युवा नेते किरण गायकवाड, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संतोष रुईकर, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, बाबुराव शहापूरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, माजी जी.प.सदस्य दिपक जवळगे, प्रा.आनंदराव सूर्यवंशी, संदीपान बनकर, परमेशवर साळुंके, आकाश जाधव, सरपंच, उपसरपंच, यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.