Views



*शिक्षक सहदेव गोरे यांनी सामाजिक भावना जपत कै.मालनबाई साधु रसाळ यांच्या स्मरणार्थ ग्रामीण रुग्णालयास वाॅटर डिस्पेन्सर मशीन भेट*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्दचे रहिवाशी सध्या जिल्हा परिषद रत्नागिरी येथे प्राथमिक शिक्षक असणारे सहदेव गोरे यांनी सामाजिक भावना जपत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तसेच ग्रामीण रुग्णालय लोहारा येथील कोवीडरुग्ण, बाळांतमाता, वयोवृध्द रुग्ण, रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, सर्व स्टाफ यांचे आरोग्य लक्षात घेता मावशी कै.मालनबाई साधु रसाळ यांच्या स्मरणार्थ ग्रामीण रुग्णालयास वाॅटर डिस्पेन्सर मशीन भेट दिली. यावेळी विकास घोडके यांनी आपल्या मनोगतात मशीन चांगल्या प्रकारे वापरुन व जपणुक करुन दात्याने दिलेल्या वस्तुचा सर्वांना चांगला लाभ रुग्णालयात व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी गोरे यांनी कोवीडची भयंकर निर्माण झाली. परीस्थितीमध्ये गरम पाण्यात गुळण्या कराव्यात असा संदेश विविध माध्यमातून सांगितला जात होता. पण कोवीड सेंटर तसेच रूग्णालयात गरम, शुद्ध थंड पाणी कसे उपलब्ध होईल, यातुन सामाजिक बांधिलकी म्हणून मावशीच्या स्मरणार्थ मशिन भेट दिली. यावेळी श्रीहरी रसाळ यांनी मशीनची माहीती रुग्णालयातील अधिक्षक डॉ.गोविंद साठे यांना दिली. यावेळी रूग्णालयाचे अधिक्षक डॉ.गोविंद साठे, डॉ.इरफान शेख, सतिश गिरी, सहदेव गोरे, सरपंच सचिन रसाळ, विलास जेवळीकर, विकास घोडके, बालाजी बिराजदार, रविकिरण जगताप, राजेंद्र पवार, भिमाशंकर डोकडे,अमोल वाले, आदी उपस्थित होते. मशिन भेट दिल्याबद्दल डॉ.साठे यांनी सहदेव गोरे यांचे आभार मानले.
 
Top