Views*कास्ती बु शिवारात कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरणाच्या पाडसाला सर्प व प्राणीमित्र श्रीनिवास फुलसुंदर यांनी सामाजिक भावना जपत वेळीच उपचार करुन प्राण वाचविले* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील कास्ती (बुद्रुक) शिवारात कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरणाच्या पाडसाला शहरातील सर्प व प्राणीमित्र श्रीनिवास फुलसुंदर माळी यांनी सामाजिक भावना जपत वेळीच उपचार केल्याने पाडसाचे प्राण वाचले. यांनी उपचारानंतर पाडसाला वन विभागाच्या स्वाधीन केले. तालुक्यतील कास्ती शिवारात ओंकार परसे यांच्या शेतात शनिवारी दि.12 जुन 2021 रोजी सकाळी अकराच्या सुमारास हरणाचा कळप आला होता. यावेळी शेतातील काही कुत्र्यांनी हरणाच्या कळपावर हल्ला केला. यात दीड महिन्याचे पाडस कुत्र्याच्या तावडीत सापडले. शेतकरी ओंकार परसे यांनी वेळीच सतर्कता दाखवत कुत्र्याला हुसकावून लावले. जखमी झालेल्या पाडसाला पाहून परसे यांनी लोहारा शहरातील सर्प व प्राणीमित्र श्रीनिवास फुलसुंदर यांना घटनेची माहिती दिली. फुलसुंदर यांनी तत्काळ घटनास्थळी जावून पाडसाला ताब्यात घेतले. त्यावर प्राथमिक उपचार केला. नंतर पशु अधिकारी डॉ. संतोष माळी यांनी पुढील उपचार केला. यावेळी कृषी साहयक शैलेश जट्टे, अमोल माळी उपस्थित होते. उपचारानंतर पाडसाला वन विभागाच्या ताब्यात दिले.
 
Top