Views



*माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील व भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अवाढव्य खर्चाला
 फाटा देत कोविड सेंटर मध्ये अंडे व गरीब, गरजु कुटुंबाना अन्न धान्य व किराणा साहित्य, मास्क व सॅनेटाईझर वाटप*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


कोरोनाचा प्रादुर्भाव लोहारा शहरात व तालुक्यात वाढत आहे. गेल्या वर्षभरापासून सतत लॉकडाऊन मुळे गोरगरीब लोकांना कामे नसल्याने यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील व भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अवाढव्य खर्चाला फाटा देत सामाजिक भावना जपत लोहारा शहरात गरीब गरजु कुटुंबाना अन्न धान्य व किराणा साहित्य वाटप करण्यात आले. व तसेच लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथील कोविड सेंटर मधील रुग्णांना अंडे वाटप व भोसगा, आष्टा मोड येथे मास्क व सॅनेटाईझर वाटप करण्यात आले. यावेळी बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, माजी नगरसेवक आयुब शेख, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, व्यापार आघाडी सरचिटणीस परमेश्वर माशाळकर, पं.स.सदस्य वामन डावरे, प्रसिद्धी प्रमुख जयेश सुर्यवंशी, महादेव कोरे, काशीनाथ घोडके, माजी सैनिक आघाडी अध्यक्ष गहिनीनाथ कागे, बसवराज कोंडे, राजु गायकवाड, अभिषेक मोटे, बसवराज शेरीकर, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस विविध कार्यक्रम घेऊन भाजपाचे कार्यकर्ते व मित्रमंडळी प्रत्येक वर्षी सामाजिक उपक्रम राबवित जल्लोषाने साजरा करीत असतात. परंतु कोरोनाच्या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन मित्र परिवार व भाजपाचे कार्यकर्त्यांच्या वतीने गेल्यावर्षी पासुन सामाजिक उपक्रम राबवित आगळा वेगळा कार्यक्रम येऊन अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त कोणीही हार, पुष्प गुच्छ, शाल, आणुन सत्कार करु नये, मि सत्कार स्वीकारणार नाही. असे आवाहान भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले होते. या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

 
Top