Views



*सालेगाव येथे होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी-रक्षाचे स्मारक – आ. ज्ञानराज चौगुले, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

सालेगाव येथे होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी-रक्षाचे स्मारक होणार असल्याचे प्रतिपादन आ. ज्ञानराज चौगुले यांनी केले. लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी – रक्षाचे स्मारक, क्रांन्ती परिसर येथे भव्य स्मारक उभे करणे या कामाचे भूमिपूजन दि.31 मे 2021 रोजी आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व युवा नेते किरण गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आ.चौगुले बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त निवडक अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांच्या सर्वांगीण विकास करणे या हेतूने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक : दवसू 2016 / प्र.क्र.156 / अजाक दि.12 ऑगस्ट 2016 नुसार मा.मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास करणेसाठी समिती गठीत करण्यात आलेली होती. सदर समितीची बैठक होऊन आ. ज्ञानराज चौगुले, विधानसभा सदस्य, उमरगा – लोहारा यांच्या शिफारशीने सालेगाव या गावाची निवड करण्यात आलेली होती. तसेच सालेगाव येथे युगप्रवर्तक चैत्यविहार, बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी – रक्षाचे स्मारक, क्रांती परिसर येथे भव्य स्मारक उभे करण्यासाठी मंजुरी व निधी मिळणेबाबत पत्राद्वारे मागणी केली होती. यानुसार या कामासाठी 5 कोटी 94 लाख 18 हजार 377 इतका निधी मंजूर झाला होता. या भव्य स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शिवसेना युवा नेते किरण गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता किशोर पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, बाबुराव शहापुरे, विलास भगत, संजय रणखांब, व्यंकट बदुरे, प्रवीण गोरे, स्वप्नील चव्हाण, मुरली पाटील, विजयकुमार भालेराव, अविनाश भालेराव, अण्णासत्व भालेराव, आविष्कार भालेराव, रोहित भालेराव आदी उपस्थित होते.
 
Top