*कोरोना व्हायरस वर मात करणाऱ्या आठ बालकांचा सत्कार!! आयटीआय कोविड सेंटर कळंब येथून मिळाला डिस्चार्ज*
कळंब (प्रतिनिधी)
एकाच दिवसात आठ लहान मुलांनी कोरोना व्हायरसचा पराभव करत कोरणा मुक्त झाल्याची आनंददायी व आशादायी बातमी आज कळंब येथून समोर येत आहे.कळंब आयटीआय कोविड केअर सेंटरमधून या आठ बालकांना आज डिस्चार्ज देण्यात आला. एकीकडे लहान मुलांच्या कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच त्यातून बरे होणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. विशेष म्हणजे या विषाणूंनी लहान मुलांना सुद्धा बाधित केले आहे. असे असले तरी बरे होणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे.
आज कळंब येथून श्रुती सोळंके, शैलेश सोळंके, स्नेहल जाधव, ऋषिकेश इंगळे,श्रद्धा इंगळे,अक्षरा चंदनशिव, नमन धामणगे, विशाल पवार या आठ बालकांनी कोरोनावर मात केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शकीलभाई काझी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय चर्मकार महासंघ युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम आणि दयावान प्रतिष्ठानचे अध्यक्ष इम्रान मुल्ला, अभय गायकवाड यांनी लहान बालकांना कॅडबरी पॅक व पुष्पगुच्छ देऊन सदर कार्यक्रम पार पडला. त्यांच्या कोरोनाच्या या लढ्यात डॉ.जीवन वायदंडे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अभिजित लोंढे,डॉ.स्वप्नील शिंदे,
डॉ.रुपेश चव्हाण,डॉ.ऐश्वर्या जगताप,
डॉ.स्नेहा कोयले यांनी परिश्रम घेतले.