*आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी व वार्डबॉय यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान*
कळंब (प्रतिनिधी)
जग कोरोना विषाणू विरोधात लढत आहे. प्रत्येकालाच स्वतःची व कुटुंबाची काळजी वाटत आहे. त्यातही आरोग्य, पोलिस, नगर परिषद कर्मचारी हे कोरोना योद्धे निस्वार्थपणे लढा देत आहेत. या योद्ध्यांची काळजी घेणारे योद्धेही पडद्या मागून सेवा देत आहेत. त्यातच रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांच्याबरोबरच सफाई कर्मचारी आणि वार्डबॉय यांची भूमिकाही महत्वाची आहे.
उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे रुग्णालय सफाई कर्मचारी आणि वार्डबॉय यांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते शकीलभाई काझी यांच्या संकल्पनेतून दयावान प्रतिष्ठानचे अध्यक्ष इम्रान मुल्ला, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम व अलिम दारुवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सन्मान पार पडला.सन्मानार्थ महिला सफाई कर्मचारी यांना साड्या तर वॉर्ड बॉय यांना ड्रेस देण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे तहसील कार्यालय कळंबचे नायब तहसीलदार अस्लम जमादार व वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांच्या हस्ते कोविड योद्धांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शेख नासिर, अमोल बनसोडे, अभिषेक कांबळे, रुपेश कांबळे, मनोज गाडे, अनिता शिंदे,भामाबाई पवार, बालिका चोंदे, यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ. प्रशांत जोशी,डॉ. शोभा वायदंडे,व्यंकट लोमटे, डॉ.निलेश भालेराव ,डॉ. स्वप्नील शिंदे, परिचारिका वर्ग उपस्थित होते.