Views


*कै.माधवराव (काका) पाटील यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करुन पुण्यतिथी साजरी*                         

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
 
सध्या ग्रामीण भागात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग टाळण्यासाठी साध्या पध्दतीने विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष कै.माधवराव (काका) पाटील यांची 19 वी पुण्यतिथी गुरुवारी दि.20 मे रोजी साजरी करण्यात आली. यावेळी कै.माधवराव पाटील यांच्या समाधीस्थळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील, विराट कल्याणी आदींनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.       
 
Top