Views


*कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात कोविड केअर सेंटर मध्यील डॉक्टर व परिचारीका यांना फेसशिल्ड चे वाटप करण्यात आले*

कळंब (प्रतिनिधी) 

कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात कोविड केअर सेंटर मध्ये रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व परिचारीका यांना फेसशिल्ड चे वाटप करण्यात आले.
          कळंब तालुका पत्रकार संघा चे नूतन अध्यक्ष अशोक शिंदे यांच्या वाढ दिवसानिमित्त कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांना वर उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका यांना फेस शिल्ड चे वाटप करण्यात आले. या वेळी नूतन अध्यक्ष अशोक शिंदे यांचा सत्कार ही करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ पुरुषोत्तम पाटील, कळंब पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे, माजी नगरसेवक प्रताप मोरे, डॉ. अभिजित जाधवर, रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी चे अध्यक्ष डॉ गिरीश कुलकर्णी, सचिव सचिन पवार, डॉ. प्रशांत जोशी, पत्रकार बालाजी निरफळ, पत्रकार ज्ञानेश्वर पतंगे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे कळंब तालुकाध्यक्ष शिवाजी सिरसट आदी उपस्थित होते..

 
Top