Views


*सामाजिक कार्यकर्त्यांच्या जागरूकते मुळे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र व ई- पासचे पर्दाफाश*

कळंब (प्रतिनिधी)

कोरणा निगेटिव्ह असल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून त्याचा वापर जिल्ह्यात किंवा परराज्यात जाण्यासाठी आवश्यक असलेल्या ई- पास साठी केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. पोलीसांनी या प्रकरणात चौकशी केल्यानंतर सदर प्रकरणी सत्याता आढळल्याने बुधवारी सायंकाळी कळंब येथील एका  तरुणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे मृत व्यक्तींच्या नावे हे वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करण्यात आले होते.सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या काही तरुणांनी  हा प्रकार समोर आणला आहे.कळंब शहरातील पुनर्वसन सावरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विकास कदम.तसेच इम्रान मुल्ला, शकील काझी, सलिम आत्तार या तरुणांनी अमित जाधवर नावाचा एक व्यक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे ई-पास काढून देत असल्याची माहिती मिळाली त्याची खातरजमा करण्यासाठी तरुणांनी ई-पास काढून घेण्याचा निर्णय केला‌. त्यानंतर अमित जाधवर यांना फोन करून हैदराबाद येथे जाण्यासाठी ई- पास काढून हवा होत आहे असे सांगितले मिळेल का अशी विचारणा केल्यावर जाधवर यांनी एक हजार शंभर रुपये लागतील असे सांगितले यासाठी आवश्यक असणारे कोरोना निगेटीव्ह  प्रमाणपत्रही तो उपलब्ध करून देईल असे सांगण्यात आले.
     यानंतर 17 मे रोजी सत्यता  पडताळण्यासाठी विकास कदम यांनी त्याचे त्यांचे स्वतःचे व त्यांचे मयत आजोबा माणिक मारुती कदम व आमिना  महेबूब बागवान यांचे आधार कार्ड पाठविल्यानंतर आठशे रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले हे पैसे 
विकास कदम यांनी ऑनलाईन ट्रान्सफर केले. या नंतर सायंकाळी सहा वाजता अमित जाधवर यांनी विकास कदम यांना मोबाईल द्वारे ई- पास पाठवून दिला शिवाय रात्री १०:३० वाजता तिघांचे कोरोना निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र पाठवून दिले
बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून अमित जाधवर हे फसवणूक करीत असल्याची तक्रार 18 मे रोजी श्री विकास कदम यांनी कळंब पोलीस ठाण्यात दिली यानंतर पोलिसांनी या प्रकरणात प्रकाराची चौकशी करून त्यात तथ्य आढळून आल्याने बुधवारी सायंकाळी आरोपी अमित जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.



सदर चे प्रकार खूप गंभीर असून याचे मोठे रॉकेट असल्याचे शक्यता नाकारता येत नाही म्हणून प्रशासनाने सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करत रॉकेटच्या मुख्य सुत्रधार पर्यत पोहचावे


विकास कदम
सामाजिक कार्यकर्ते कळंब
 
Top