Views
*कास्ती (खुर्द) येथील लाभार्थींना पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य वाटपाचा शुभारंभ सरपंच सागर पाटील यांच्या हस्ते* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत लाभार्थींना अतिरिक्त मोफत धान्य वाटपाचा शुभारंभ लोहारा तालुक्यातील कास्ती (खुर्द) येथील स्वस्त धान्य दुकानात सरपंच सागर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत 2 महिने प्राधान्य कुटुंबाच्या व अंत्योदय योजनेतील कुटुंबाच्या लोकांसाठी प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ अतिरिक्त मोफत देण्यात येत आहे. यावेळी उप सरपंच इंद्रजित लोभे, विठ्ठल बनसोडे, दसरथ साळुंके, पंडित भुजबळ, लिंबराज हिलसुरे, यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
 
Top