Views



*उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात श्री स्वामी समर्थ मंदिर मार्फत दररोज अन्नदान*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 बालाजी नगर, शेकापूर येथील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या वतीने 4 मे 2021 पासून जिल्हा रुग्णालयात अन्नदान सेवा सुरू करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ मंदिर ,स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, बालाजी नगर, शेकापूर रोड, धाराशिव याठिकाणी गेली 6 वर्ष निरंतर जर पौर्णिमेला अन्नदान करण्यात येत होते. परंतु हे अन्नदान गेल्या वर्षी खंडित झाले. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे एकेदिवशी पहाटे भ्रममुहूर्तावर स्वामींनी दृष्टांत दिला आणि हे अन्नदान रुग्णालयातील नातेवाईक यांच्यासाठी करा असे सांगितले. ही सत्य घटना आहे. कारण मंदिर स्थापने पासून ते आजपर्यंत मंदिराची सर्व जबाबदारी व व्यवस्था संतोष क्षीरसागर यांच्याकडे आहे. त्यामुळे बहुदा महाराजांनी हे संतोष याना सुचवले असावे. त्यानुसार संतोष यांनी ग्रुपवर स्वामी भक्तांना अन्नदानाचे आवाहन केले, आणि ४ तासात पहिल्या करा अन्नदात्यांनी अकाउंटवर प्रत्येकी २५००/- रुपये पाठवले आणि त्यातून हा अन्नदानाचा महायज्ञ सुरू केला. 4 मे पासून आज पर्यंत अविरत हा यज्ञ चालू आहे, महाप्रसाद/ अन्नदान मोहिमेचे 19 दिवस 22 मे रोजी पूर्ण झाले, संतोष क्षीरसागर, संस्थापक सेवक श्री स्वामी समर्थ मंदिर, सर्व अन्नदाते प्रदीप रोंगे, अभिजित बेगमपुरे, प्रतीक राठोड, रविकिरण सुतार, रामचंद्र राठोड, नानासाहेब मुंडे, धीरज लकापते, दिलीप साळुंके, विद्याधर क्षीरसागर, नानासाहेव लोखंडे, डॉ.अनिल देशमाने, यांचे याकामी योगदान आहे. त्याच बरोबर स्वामी भक्त रामेश्वर भोसले, व महिला स्वामी भक्तांनी या महाअन्नदानास आपले योगदान दिले. त्या वायकर काकू, कुलकर्णी काकी ,साळुंके वहिनी,दंडनाईक काकू, यांचे व त्याच बरोबर दिवस भर कष्ट करून बिना मोबदला ज्याने हा महाप्रसाद बनवला तो परशुराम रसाळ ,तेजसकुमार नागवसे ,दीपक रसाळ ,खंडू मसाळ ,संकेत हाजगुडे, करण गवळी, नागेश भादुले यांनी देखील हा महाप्रसाद बनवून तो पॅक करेपर्यंत आपले सेवा रुपी योगदान दिले. या सर्व स्वामी भक्तांचे आभार मानले. व स्वामी चरणी प्रार्थना की यांना व यांच्या कुटुंबाला सुख, समृद्धी, ऐश्वर्य, लाभो. या 19 दीवसाच्या महाअन्नदान यास प्रेरित होऊन खालील अन्नदाते यांनी ही इच्छा व्यक्त केली आणि प्रत्येकी 2500 रुपये दिले त्यांचे अन्नदान हे १५ मे पासून सुरू झाले. 15 मे रोजी शिवप्रसाद लक्ष्मण काजळे यांच्या वतीने महाप्रसाद करण्यात आला. 16 मे रोजी सागर करंडे यांच्या वतीने कै.रामेश्वर त्र्यंबक करंडे यांच्या समरणार्थ महाप्रसाद करण्यात आला आहे. 17 मे रोजी नामदेव पंढरीनाथ भांडकरी यांच्या वतीने कै. पंढरीनाथ विठोबा भांडकर यांच्या स्मरणार्थ महाप्रसाद वाटप करण्यात आला. प्राचार्य श्री गोरख विश्वनाथ देशमाने यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री च्या स्मरणार्थ महाप्रसाद करण्यात आला. कैलास नाईक यांच्या वतीने कै. रामलिंग जनार्धन लकापते यांच्या समरणार्थ महाप्रसाद करण्यात आला. हे अन्नदान 4 मे पासून ते 22 मे पर्यंत तर सध्या करन्यात आले आहे, रुग्णांच्या नातेवाईक यांना प्रोटीन, किंवा त्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून रोज 25 किलो कोलम रेडचेरी राईस, अर्धा किलो काजू, अर्धा किलो बदाम, अर्धा किलो मनुके, एक किलो हिरवा वाटाणा, दीड किलो मोड आलेली मटकी या ड्राय फूडचा समावेश करतो ,या अन्नदानामध्ये रोज 350 रुग्णांच्या नातेवाईकांना हा मसाला राईस देतोय आज 19 दिवस हे अन्नदान सुरू आहे. जर स्वामी इच्छा व अन्नदात्यांनी आणखी अन्नदानास मदत केली तर हे अन्नदान अविरत चालू ठेवण्याचा संकल्प आहे.
 
Top