Views


*कोरोनाने मरणपावलेल्या रुग्णांचे अंत्यविधी करणाऱ्या नगर परिषद कर्मचाऱ्यासह आरोग्य यंत्रणेचा कोविड योद्धा म्हणून सन्मान*

कळंब (प्रतिनिधी)

        कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत (Corona Virus Second Wave) देशभरात हाहाकार माजला आहे. अशावेळी आपलं घरदार विसरून जीवाचा धोका पत्करून अथक काम करत आहेत ते डॉक्टर्स, परिचारिका, नगर परिषद कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आरोग्य यंत्रणा आणि नगर परिषद कर्मचारी अखंड राबते आहे. अनेक लोकांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोना लाटेत कामाचा खूप ताण वाढत आहे, तरीही कोणतीही कुरकुर न करता, रात्रंदिवस ते लोकांचा जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत.
   या कामाची दखल घेत दयावान प्रतिष्ठान व राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना युद्धांचा अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला.
   कोरोणा योध्दा म्हणून समानित करताना 'एक झाड उपक्रम' या अंतर्गत प्रत्येक कर्मचाऱ्यांना विविध फळांची व फुलांची रोपटे भेट देण्यात आली.
   सदर उपक्रम दयावान प्रतिष्ठानचे अध्यक्ष इम्रान मुल्ला व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम यांच्या मार्गदर्शनातून पार पडला.
    या उपक्रमांतर्गत उपजिल्हा रुग्णालय कळंब या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे, डॉ.शोभा वायदंडे, डॉ.प्रशांत जोशी,डॉ. गीते, डॉ.मंजूराणी शेळके,डॉ. श्याम चौधरी, डॉ. इमरान शेख; त्याचप्रमाणे परिचारिका यादव, उगलमुगले, बनकर, जाधवर, शेख व गोसावी यांचाही सन्मान करण्यात आला.
       त्याचप्रमाणे आयटीआय कोविड सेंटर या ठिकाणी डॉ.रुपेश चव्हाण, डॉ.स्नेहा कोयले, सिस्टर वनवे यांच्यासह वॉर्डबॉय अमित गांजेकर व मजहर सय्यद यांचा सन्मान करण्यात आला. नगर परिषद आरोग्य विभागात कल्याण गायकवाड,महादेव हाजगुडे, प्रसन्ना माळी, सतीश आईवले,सुधाकर धावारे,मच्छिंद्र ताटे,प्रतिशयश गायकवाड, राजेंद्र गायकवाड, अब्दुल शेख, शुभम बिडलाम,धीरज गायकवाड, संजय इरेवर यांचा सन्मान पार पडला..
      हा उपक्रम पार पडण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम, दयावान प्रतिष्ठान अध्यक्ष इम्रान मुल्ला, अलिम दारुवाले, शकील काझी यांनी परिश्रम घेतले.
 आरोग्य यंत्रणा आणि नगर परिषद कर्मचारी या संकटसमयी रात्र-दिवस काम करत आहेत.त्यांच्या या कामाचं,सेवा वृत्तीचं मोल कशानेच होऊ शकत नाही. 
शकील काझी
सामाजिक कार्यकर्ते

 विशेषतः परिचारिका या काळात करत असलेल्या सेवेचे योगदान अमूल्य आहे. आपलं घर, कुटुंब यापासून दूर राहत दिवस-रात्र त्या रुग्णांची सेवा करत आहेत. मूलभूत सोयीसुविधांची वानवा असूनही अनेक परिचारिका आणि कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहेत.त्यांचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
  अलिम दारुवाले
दयावान प्रतिष्ठाण कळंब
 
Top