*मोदी सरकारच्या सातव्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपा लोहारा तालुका यांच्या वतीने महसुल, आरोग्य, पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आघाडीच्या केंद्र सरकारला सात वर्षे पुर्ण झाल्याने माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, यांच्या सुचनेनुसार भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आ.सुजीतसिंह ठाकूर, आ.राणाजगजिसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा बुद्धीजिवी प्रकोष्ठ तथा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा लोहारा तालुका यांच्या वतीने कोरोणाचे नियम पाळीत महसुल, आरोग्य, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कोरोणाच्या काळात जिवाची पर्वा न करता रात्रणदिवस रुग्णांस सेवा देत असल्याबद्दल व कोरोना आजारा बाबत जनमानसात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. या कार्याची दखल घेत दि.29 मे 2021 रोजी लोहारा तालुका भाजपाच्यावतीने तहसिलदार संतोष रूईकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोविंद साठे, डॉ.बाळासाहेब भुजबळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, डॉ.इरफान शेख, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, सहायक पोलिस निरीक्षक एस.आर.गोरे, पोलिस उपनिरीक्षक ए.एन.वाठोरे, पोलीस उपनिरीक्षक जी.बी.कदम, शालिनी मोरे, के.एस. सुरवसे, पाशुमिया मुजावर, आदिंचा सत्कार भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, माजी नगरसेवक आयुब शेख, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस शिवशंकर हतरगे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, माधव सिरसाठ, नाथा फुलसुंदर, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.