Views*मोदी सरकारच्या सातव्या वर्षपुर्तीनिमित्त भाजपाच्या वतीने जेवळी येथे कोव्हीड योद्धांचा सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला 7 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपच्या वतीने सेवा कार्य दिन व सेवा सप्ताह निमित्त लोहारा तालुक्यातील जेवळी येथे कोरोनाच्या काळात जिवाची पर्वा न करता अहोरात्र झटणाऱ्या कोव्हीड योद्धयांचा कृतंज्ञता पूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र जेवळी येथील वैद्यकीय अधिकारी अहिल्या अधाव, शुभव दळवी, अमोल सूर्यवंशी आरोग्य स्टाफ व आशा कार्यकर्त्या, पोलीस पाटील धनराज हावळे या सर्वांचा भारतीय जनता पार्टी जेवळी शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळीभारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारणी सदस्य भोजप्पा कारभारी, भाजपा युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, भाजपा बुद्धिजीवी तालुका संयोजक उदय कुलकर्णी, भाजपा तालुका उपाध्यक्ष रविराज कारभारी, भटक्या विमुक्त आघाडी तालुका अध्यक्ष शिवाजी दंडगुले, श्रीशैल बिराजदार, उपस्थित होते.
 
Top