Views





*लोहारा शहरातील ग्रामीण रुग्णालयच्या अंतर्गत चालु असेलेले दोन्ही कोविड सेंटरला कै.कलावती बाबुराव बिराजदार याच्या स्मरणार्थ युवासेना तालुका प्रमुख अमोल दत्तात्रय बिराजदार यांच्या वतीने लागणारे स्पिकर, माईक व लागणारे मशीन आ.ज्ञानराज चौगुले साहेब यांच्या हस्ते*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला



लोहारा शहरातील ग्रामीण रुग्णालयच्या अंतर्गत चालु असेलेले दोन्ही कोविड केअर सेंटरला कै.कलावती बाबुराव बिराजदार याच्या स्मरणार्थ युवासेना तालुका प्रमुख अमोल दत्तात्रय बिराजदार यांच्या वतीने लागणारे स्पिकर, माईक व त्यासाठी लागणारे मशीन आमदार ज्ञानराज धोंडीराम चौगुले यांच्या हस्ते देण्यात आले. लोहारा ग्रामीण रुग्णालयाला कोविड केअर सेंटर मध्ये कोरोना रुग्णाला औषध घेणे, रुग्णाची तपासणी करणे यासाठी त्याना गर्दि न करता बोलवण्यासाठी व ग्रामीण रुग्णालयाला शहरात व इतर गावामध्ये लसिकरण, ग्रामीण रुग्णालयाच्या सुविधा गावोगावी पोहवण्यासाठी लागणारे स्पिकर, माईक व त्यासाठी लागणाऱ्या मशीन बिराजदार कुटुंबाच्या वतीने आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.गोविंद साठे यांना देण्यात आले. व तसेच लोहारा शहरातील सर्व आशा कार्यकर्त्याना कोरोनाच्या प्रादुर्भावापासुन बचावासाठी सॅनिटायझर, मास्क, वेपोराईर मशिन व पावसाळा सुरु होत असल्यामुळे छत्री देण्यात आली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ.गोविंद साठे, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, युवा सेवा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक अभिमान खराडे, शाम नारायणकर, जगदीश लांडगे, कानेगावचे सरपंच नामदेव लोभे, माजी प.स.सदस्य सुधिर घोडके, माजी ग्रा.पं.सदस्य महेबुब गंवडी, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, आमिन सुंबेकर, प्रेम लांडगे, दत्ता मोरे, भरत सुतार, शहाजी जाधव, शहरातील आशा कार्यकर्त्या यांच्यासह रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

 
Top