Views




*लोहारा शहरातील लाभार्थींना पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य वाटपाचा शुभारंभ आ.
ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत लाभार्थींना अतिरिक्त मोफत धान्य वाटपाचा शुभारंभ लोहारा शहरातील स्वस्त धान्य दुकानात आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व तहसीलदार संतोष रूईकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत 2 महिने प्राधान्य कुटुंबाच्या व अंत्योदय योजनेतील कुटुंबाच्या लोकांसाठी प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ अतिरिक्त मोफत देण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धान्य देऊन करण्यात आले. यावेळी तहसीलदार संतोष रुईकर, नायब तहसीलदार रणजीत शिराळकर, शिवसेना तालुका प्रमुख मोहन पणुरे, शहर प्रमुख सलीम शेख, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, धान्य दुकानदार इनुस पटेल, नामदेव लोभे, 
युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, जगदीश लांडगे, महेबूब गवंडी, परवेज तांबोळी, आमीन सुंबेकर, शिवा सुतार, महेबुब फकीर, प्रेम लांडगे, शिवा सुतार, आदि, उपस्थित होते.
 
Top