Views




*औद्यागिक प्रशिक्षण संस्था येथील कोविड केअर सेंटर मध्ये ८६ पॉझिटिव्ह रुग्णांचा भार अल्पशा डॉक्टरांवरच*

कळंब(प्रतिनिधी) : 

येथील औद्यागिक प्रशिक्षण संस्था येथील कोविड केअर सेंटर मध्ये ८६ पॉझिटिव्ह रुग्णांचा भर अल्पश डॉक्टरांवरच आहे. याठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर स्वत:च्या जिवाची पर्वा न करता दररोज २० तासाच्या आसपास आपले कर्तव्य निभावत रुग्णांचे जीव वाचवत आहेत. 
    कोरोनाची दुर लाट उसळल्यामुळे तालुक्यात कोरोनाचा विळखा वाढत गेला. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले. तर आरोग्य यंत्रणा हातबल होण्याची वेळ आली आहे. आणखीन रुग्ण वाढतच चालल्यामुळे या मध्ये गंभीर रुग्णांची संख्या सुध्दा लक्षणीय वाढ असल्याचे दिसुन येत आहे. उपजिल्हा रुग्णालयात डीसीएससी सेंटर मध्ये ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले आहेत. व येथे ऑक्सिजन कमी असणारे, व्हेंटिलेटर ची गरज असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रायगड मंगल कार्यालय, मोहेकर वसतिगृह येथे सुध्दा पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन जाण्याऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. याला कारणीभूत म्हणजे या ठिकाणी असलेल्या रुग्णांना डॉक्टर व परिचारिका यांच्याकडून दिला जाणारा मायेचा, आपुलकीचा, प्रेमाचा आधार होय. वैद्यकीय उपचारासोबतच रुग्णांना दिला जाणारा धीर, माया हे सुध्धा जास्तीचे दिलासादायक ठरत चालले आहे. 
     कारण अशावेळी त्या रुग्णाच्या जवळ त्यांचे नातेवाईक कोणी नसतात तर अशा वेळी याठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर्स, परिचारिका हे नातेवाईकांची पण भूमिका निभावत असल्याने रुग्णांना चांगलाच दिलासा मिळतोय आणि लवकर बरे होऊन घरी परतत आहेत. 
    औद्यागिक प्रशिक्षण संस्था येथील कोविड केअर सेंटर डॉ. प्रशांत जोशी, डॉ. रुपेश चव्हाण, डॉ. स्नेहल कोयले, तसेच अन्य केंद्रावर सुध्दा वैद्यकीय अधिक्षक डॉ जिवन वायदंडे, डॉ. पुरुषोत्तम पाटील, डॉ. प्रशांत जोशी, डॉ. सुधीर आवटे, डॉ. इम्रान शेख हे वेळोवेळी योग्य ती मदत करत आहेत.
     उपजिल्हा रुग्णालयातील डिसीएससी कोविड केअर सेंटर मध्ये गंभीर असणाऱ्या ३० जणांवर या ठिकाणी ऑक्सिजन बेड ची कमतरता भासत असल्यामुळे आमदार कैलास घाडगे यांनी पुढाकार घेऊन औद्यागिक प्रशिक्षण संस्था येथे २० ऑक्सिजन बेड तयार केले आहे. येथे सध्या १५ जणांना ऑक्सिजन देण्यात येत आहे. 
     औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील कोविड केअर सेंटर मध्ये डॉ. रुपेश चव्हाण हे २४ तास काम करत आहेत. तर त्यांना डॉ. स्नेहल कोयले ह्या सहकार्य करत असुन या सुध्दा १५ तासापेक्षा जास्त काम करत आहेत. डॉ. चव्हाण व डॉ. कोयले हे दोघे रुग्ण तपासणी करताना रुग्णांकडे विशेष लक्ष देतात. तसेच आपुलकीने विचारपूस करुन पॉझिटिव्ह रुग्णांना आधार देतात. आणि कुटुंबांतील व्यक्ती प्रमाणे त्यांची काळजी घेत असतात .८४ पॉझिटिव्ह रुग्णांवर सध्या ते उपचार करत आहेत.
     औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील कोविड केअर मध्ये नव्याने दाखल झालेल्या पाच ऑक्सिजन कोंसीट्रेटर मशीन ची तंत्रशुद्ध तपासणी शनिवार ता.१५ रोजी डॉ.जीवन वायदंडे, डॉ.अभिजित लोंढे, डॉ.रुपेश चव्हाण, डॉ.स्नेहा कोयले यांनी तपासणी केली.
-----------------------------------------------
 
Top