Views
  *हिंगोली चे खासदार राजीव सातव यांचे दुःखद निधन*

उस्मानाबाद( प्रतिनिधी)

    हिंगोली काँग्रेसचे खासदार अ‍ॅड. राजीव सातव
यांना कोरोना लागन झाली होती.त्यांच्यावर पुण्यातच जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक 24 तास त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते.
     काँग्रेसचे खासदार अ‍ॅड. राजीव सातव पुणे येथील जहांगीर हॉस्पिटल येथे कोविडवर उपचार घेत होते. 29 एप्रिल रोजी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. तातडीने गरज भासल्यास इक्मो मशीन देखील उपलब्ध करण्यात आली होती. मुंबईल येथील डॉ. राहुल पंडित, डॉ. शशांक जोशी यांच्या पथकाने पुणे येथे येऊन त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार दरम्यान आज सकाळी खासदार ॲड.राजीव सातव यांचे निधन झाले.

 
Top