Views


*उमरगा तालुका गणित मंडळ व सप्तरंग मित्र मंडळ, उमरगा यांनी जपली सामाजिक बांधीलकी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 उमरगा तालुक्यातील गणित शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी तालुका गणित मंडळाची स्थापना सहा सात वर्षापूर्वी केली. या मंडाळाच्या माध्यमातून गुणवत्ता वाढीसाठी, online शिक्षण देण्यासाठी सतत कार्य केले जाते. सध्याच्या साथ रोगाच्या काळात सामाजिक उत्तरदायीत्व जपणे हे आपले कर्तव्य आहे, आणि ते जपले पाहीजे याची जाणीव या गणित शिक्षकांनी ठेवली. शासन निर्णयानुसार एक दिवसाचे वेतन देऊन न थांबता आपल्या परिसरातील कोवीड बांधवांसाठी काहीतरी केले पाहीजे हा विचार घेऊन मंडाळातील शिक्षक बंधुंनी वर्गणी जमा केली. या वर्गणीतुन कोवीड सेंटरच्या सोईसाठी oxygen concentrater माशीन घ्यायची व कसलेही शासकीय मदत नसलेल्या सेंटरला द्यायचे ठरले. ही बातमी समजताच उमरगा तालुक्यात सामाजिक कार्यात पुढे असणाऱ्या 'सप्तरंग' मित्र मंडळाचे संताजी चालुक्य, नितीन होळे, बसवराज स्वामी,प्रविण स्वामी , संजय देशमुख, अनिल बिराजदार , माधव पवार यांनीही उत्साहाने या मधे पंचेवीस हजार वर्गणी दिली. आज ही मशीन उमाकांत माने यांना सुपुर्द केली.
 
Top