Views





*मोदी सरकारच्या सातव्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपाच्या वतीने सेवा कार्य दिन व सेवा सप्ताह निमित्त दस्तापुर येथे कोव्हीड योद्धयांचा व आशा कार्यकर्त्यांचा सत्कार*
 
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला 7 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपच्या वतीने सेवा कार्य दिन व सेवा सप्ताह निमित्त भाजपाच्या वतीने लोहारा तालुक्यातील दस्तापुर येथे दि.30 मे 2021 रोजी कोरोनाच्या काळात जिवाची पर्वा न करता अहोरात्र कार्य करणाऱ्या कोव्हीड योद्धयांचा व आशा कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोजर वाकळे, ग्रामपंचायत कर्मचारी बालाजी देडे, हनिफ पटेल, आदिंचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा ओबीसी जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुरेंद्र काळाप्पा, निखिल पाटील, विवेक चव्हाण, भाजपा तालुका प्रसिद्धी प्रमुख जयेश सुर्यवंशी, यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व आशा कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

 
Top