Views





*मोदी सरकारच्या सातव्या वर्षपुर्तीनिमित्त भाजपा परंडा तालुका यांच्या वतीने महसुल, वैद्यकीय अधिकारी, डॉ., पोलीस अधिकारी व परिचारिका यांचा सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला 7 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल परंडा तालुका भाजप यांच्या वतीने सेवा कार्य दिन व सेवा सप्ताह निमित्त परंडा शहरात दि.30 मे 2021 रोजी कोरोनाच्या काळात जिवाची पर्वा न करता अहोरात्र कार्य करणाऱ्या महसुल अधिकारी, पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, डॉ, परिचारिका, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परंडा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार सुपे, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार गायकवाड, परंडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बनसोडे व त्यांचे लढवय्ये सहकारी तसेच परंडा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी शेटे, डॉ.शिंदे व त्यांचे सहकारी तसेच रुग्णांची अहोरात्र सेवा करणारे परिचारिका ताई यांचे भाजपाच्या वतीने समाजाप्रती ऋण व्यक्त करुन सत्कार करण्यात आला. यावेळी परंडा भाजपाचे तालुकाध्यक्ष राजकुमार पाटिल, तालुका उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, तालुका सरचिटणीस  विठ्ठल तिपाले, उपस्थित होते.
 
Top