Views


*कळंब येथे भाजपा च्या वतीने सेवा कार्य दिन साजरा*

कळंब (प्रतिनिधी)

   देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला 7 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कळंब भाजपच्या वतीने सेवा कार्य दिन साजरा करण्यात आला 
भाजपाच्या वतीने सेवा कार्य दिनाचे आयोजन करण्यात आले यावेळी या कोरोनाच्या काळात जिवाची पर्वा न करता अहोरात्र झटणाऱ्या  
कोव्हीड योद्धयांचा भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय येथे कृतंज्ञता पूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी
   कोरोणा योद्धा कर्सन पटेल, संजय देवडा, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोकजी शिंदे, अमर चाऊस, नगरसेविका सरला सरवदे, शकील काझी,ऑक्सीजन ग्रुपचे सुशील तीर्थकर, अशोक काटे, चेतन कात्रे, अकिब पटेल, हर्षद अंबुरे तसेच २४ तास रुग्णाच्या सेवेसाठी तयार असणाऱ्या रुग्णवाहिकेचे चालक नाना पुरी, नितीन सावंत व कोरोणाकाळात रुग्णांच्या जेवण्याची हेंडसाळ होऊ नये याकरिता तत्पर इंद्रजीत थोरात व अनिकेत पारवे यांना सन्मानित करण्यात आले.
    कोरोणा काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता १२५ कोरणा ग्रस्त मृत्यदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या न.प.च्या११ कर्मचाऱ्यांना जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने भर पेहराव कपडे करून शाल, श्रीफळ पुष्पहार अर्पण करत त्यांनी केलेल्या या सहास पूर्ण व समाजोपयोगी कार्यक्रमासाठी सत्कार करण्यात आला या अंतर्गत महादेव हरगुडे, श्रीधर चोंदे, गजानन जाधवर, मच्छिंद्र ताटे, राजाभाऊ गायकवाड, शुभम बिडलान, अब्दुल शेख, संमत इरेवाड,सुधाकर धावणारे, प्रतिजीत गायकवाड, महावीर गायकवाड भर पेहराव कपडे करून सन्मानित करण्यात आले.
    आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सन्मान
कोरोणकाळात जगावर आलेल्या या महामारी सर्वात महत्वपूर्ण काम करणारे आरोग्य कर्मचारी यांना पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रातील सत्तेला सात वर्षे पूर्ण झाले या निमित्ताने सेवाकार्य दिनाचे औचित्य साधून कळंब शहरात आरोग्य सेवक स्वतःचा जीव धोक्यात घालून अविरत काम करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे,डॉ. पुरुषोत्तम पाटील,डॉ. निलेश भालेराव,डॉ. अभिजीत लोंढे,डॉ. बालाजी आदमपूरकर,डॉ. शरद दशरथ,डॉ. मीरा दशरथ,डॉ. स्वप्नील शिंदे,डॉ. रुपेश चव्हाण, डॉ. स्नेहा कोयले,डॉ. ऐश्वर्या जगताप स्टाफ नर्स प्रतिभा अंधारे,संगीता बनकर महातो वार्डाबॉय अभिषेक कांबळे,नासिर शेख,बालाजी चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले.
    कोविड केअर सेंटर साठी व्हेपोरायझर मशीन व सुरक्षा किटचे वाटप पूर्ण काळामध्ये वाढत्या रुग्ण संख्या आता लहान मुलाची देखील भर पडली आहे याकरिता रुग्णांना वाफ घेता यावी म्हणून व्यपर व्हेपोरायझर मशीन व आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा किट देखील वाटण्यात आल्या
यावेळी कळंब तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रशांत लोमटे, शहराध्यक्ष रोहित कोमटवार, माणिक बोंदर,संदीप बाविकर, सतपाल बनसोडे,शिवाजी शेंडगे,बाबुराव शेंडगे, शितल चोंदे, गोपाळ चोंदे, सुधीर बिक्कड,आबा रणदिवे,संजय जाधवर, सिद्धेशराजे भोसले, गोविंद गायकवाड,अशोक क्षीरसागर, इम्रान मुल्ला, अभय गायकवाड,यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

 
Top