Views


*आष्टा कासार येथे 'कृषी विभाग' यांच्या वतीने 
बीज उगवण क्षमता व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथे 'कृषी विभाग' यांच्या वतीने दि.19 मे 2021 रोजी खरीप हंगामाच्या अनुषंगाने सोयाबीन पिकाची उगवण शक्ती आणि बीजप्रक्रिया चे प्रात्यक्षिक फिजिकल डिस्टेंस राखून
घेण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग सर यांनी सोयाबीन पीक शेतीशाळा माती परीक्षण आणि खत व्यवस्थापन सोयाबीन पिकासाठी रुंद सरी वरंबा पेरणी पद्धतीचे महत्त्व सांगितले. व तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग गांडूळ युनिट, नाडेप युनिट,शेततळे यांचे क्षेत्र वाढी संदर्भात मार्गदर्शन केले. व खरीप पेरणीसाठी आवश्यक निविष्ठा या गावातील कार्यक्षम आणि इच्छुक गटामार्फत एकत्रित खरेदी करून गावामध्ये रास्त भावामध्ये विक्री कराव्यात. यामुळे वाहतूक खर्च वाहतुकी मधील इतर अडचणी आणि करोना प्रादुर्भावाचा फैलाव आणि धोकाही कमी होण्यास मदत होईल, असे सांगितले. व तसेच विश्वंभर कोरे यांच्या शेतावर कोरडवाहू क्षेत्र विकास मुरघास युनिटला भेट दिली. यावेळी प्रगतशील शेतकरी जिनेन्द्र पाटील, कृषी सहाय्यक सचिन पवार,
अभिजित पाटील, अविनाश पाटील, बाबुराव चव्हाण, संतोष पवार, राम बनसोडे, राहुल कोरे, महिला शेतकरी कमलबाई चव्हाण, लक्ष्मीबाई राठोड हजर होते. यावेळी कृषी सहाय्यक सचिन पवार यांनी सर्वांचे आभार मानले.
 
Top