Views
*जगताप क्लिनिकच्या दोन रुग्णाची कोरोनावर मात*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उमरगा येथील डॉ‌.अभिजित जगताप यांच्या जगताप क्लिनिक मधून सेवा देत आहेत. सद्या कोरोनाच्या हाहाकारात त्यांनीं रुग्णांना उत्तम सेवा देत आहेत. यात HRCT स्कोर 13 असलेल्या दोन रूग्णांना admit न करता घरच्या घरी गृह विलागिकरण मध्येच बरे केले आहेत. या मध्ये उमरगा येथील दिलीप व्यास तर भुयार चिंचोली येथील मोहन लक्ष्मण शिंदे या दोन्ही रुग्णांना ऍडमिट न करता घरी औषध उपचार करत गोळ्यावर बरे केले. आतापर्यंत डॉ.जगताप यांनी आपल्या क्लिनिक मध्ये 80 पेक्षा जास्त रूग्णांना ची निदान, तपासणी व मार्गदर्शन करून त्यांना बरे केले. डॉ.जगताप हे कोल्हापूर मधून शिक्षण पूर्ण करून पुणे येथे अनुभव घेऊन उमरगा येथे मागील वर्षा पासून उमरगा आणि परिसरातील रुग्ण सेवेत आहेत. कोरोना च्या उपचारासोबतच रुग्णामध्ये असलेले गैरसमज, लसीकरण साठी प्रेत्साहन यासाठी ते विशेष प्रयत्न करतात. आजाराचे लवकर निदान व विलगिकरणामध्ये उपचार यावर त्यांचा विश्वास आहे. कोरोना आजारासोबत च कोरोना नंतर होणाऱ्या Post Covid Complications करता त्यांचे योग्य उपचार व मार्गदर्शन करत आहेत. व याचा रुग्णांना विशेष लाभ होत आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
Top