Views
*मोदी सरकारच्या सातव्या वर्षपुर्तीनिमित्त उस्मानाबाद जिल्हा भाजपा युवा मोर्चा यांच्या वतीने आ‌.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते कोरोना योद्धांचा सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीच्या सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उस्मानाबाद येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना वारियर्स आणि कोरोना योद्धां यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना योध्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घालून दिलेल्या आदर्श नुसार भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही कोरोना योद्ध्यांचा सत्कार करत असून कोरोना काळात आरोग्य सेवा करून अनेकांचे प्राण वाचवले च्या निमित्ताने कोरोना योद्ध्यांचा सत्कार करत आहोत अशी भावना आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. कोरोना काळात कोरोना बाधित नागरिकांची रात्रंदिवस सेवा करणारे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धनंजय पाटील, निवासी शल्यचिकित्सक डॉक्टर सचिन देशमुख तसेच सामान्य रुग्णालयात कोविंड रुग्णालय सांभाळणारे डॉक्टर मुल्ला त्यांचे सर्व सहकारी, डॉक्टर्स, स्टाफ तसेच रुग्णालय परिसरात च्या नातेवाईकांना जेवणाचे डबे पुरवणारे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, ॲम्बुलन्स चालक, पोलीस कर्मचारी यांचा आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते यथोचित सत्कार करून त्यांच्या सेवेचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी ऑक्सीजन प्लांट नियमित सुरू ठेवण्यासाठी अहोरात्र काम करणारे कर्मचारी तसेच कोरोना वार्डात काम करणारे आरोग्य कर्मचाऱ्यांचाही यथोचित सत्कार आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस ऍड.नितीन भोसले, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, विनोद गपाट, विशाल पाटील, एस सी मोर्चा जिलहाध्यक्ष प्रविण सिरसाठे, नगरसेवक प्रविण पाठक, ओ.बी.सी.मोर्चा प्रसिद्धी प्रमुख संतोष क्षिरसागर, दाजीप्पा पवार, सुजीत साळुंके, सुरज शेरकर, संदीप इंगळे, सुनिल पंगुडवाले, वैभव हंचाटे, विलास सांजेकर, अमोलराजे, स्वप्नील नाईकवाडी, श्रीकांत तेरकर, प्रीतम मुंडे, गणेश एडके, सलमान शेख, प्रसाद मुंडे, अजय यादव व भाजपाचे पदाधिकारी तसेच युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उस्मानाबाद शहरातील सर्व भागामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सर्व कोरोना योध्यांचा सेवा सन्मान कार्यक्रम संपन्न झाले.
 
Top