Views
*मोदी सरकारच्या सातव्या वर्षपुर्तीनिमित्त भाजपाच्या वतीने भोसगा येथे कोव्हीड योद्धांचा सत्कार* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला 7 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपच्या वतीने सेवा कार्य दिन व सेवा सप्ताह निमित्त लोहारा तालुक्यातील भोसगा येथे कोरोनाच्या काळात जिवाची पर्वा न करता अहोरात्र झटणाऱ्या कोव्हीड योद्धयांचा कृतंज्ञता पूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी आशा कार्यकर्त्यांचा व ग्रामपंचायत कर्मचारी मारुती नायकोडे, शिवशंकर बिराजदार यांचा सत्कार भाजपा तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रसन्न एंकुडे, भिमाशंकर थाटे, पप्पु काटगावे, जळकोटे दिपक, पाटील राहुल, पाटील आप्पाराव, काटगावे यशवंत, एकुडे भैय्या, सोमनाथ वडगावे, उपस्थित होते.
 
Top