Views
*स्थानिक स्वराज्य संस्थेचे भाजपाचे आ.सुरेश आण्णा धस यांच्या वतीने लोहारा शहरातील ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजन मशीन भेट*
 
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून कुठलाही दिखाऊपणा न करता लोहारा शहरातील व तालुक्यातील रुग्णांच्या सेवेसाठी खऱ्या अर्थाने जनसेवक म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेचे भाजपाचे आ. सुरेश आण्णा धस यांच्या वतीने लोहारा शहरातील ग्रामीण रुग्णालयास oxygen constructor, ऑक्सिजन मशीन सुपूर्द करण्यात आली. यावेळी दिपक मुळे, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस शिवशंकर हतरगे, विठ्ठल वचने, माधव वकील पाटील, माजी नगरसेवक आरिफ खानापुरे, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, हरी लोखंडे, विजयकुमार ढगे, बालाजी मेनकुदळे यांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोविंद साठे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक कटारे, डॉ.बाळासाहेब भुजबळ, डॉ.इरफान शेख, पाशुमिया मुजावर, आदि, उपस्थित होते.
 यावेळी तालुका वासियांच्यावतीने भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील व दिपक मुळे यांनी आ.सुरेश धस यांचे आभार मानले.
 
Top