Views







*साई नगरील समोरील रस्ता तयार करा, रहिवाशांची मागणी!*

कळंब(प्रतिनिधी) 

     शहरापासून जवळच असलेल्या साईनगर या सोसायटी समोरील रस्ता ,रस्ते विकास महामंडळाने तात्काळ तयार करावा अशी मागणी साईनगर मधील रहिवाशांनी कार्यकारी अभियंता रस्ते विकास महामंडळ जालना व उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे .
या निवेदनात म्हटले आहे की बहुचर्चित पालखी मार्ग खामगाव, पंढरपूर या राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. शहरांमध्ये या रस्त्याचे काम कासवगतीने सुरू असून शहर मर्यादित हे काम चार पदरी आहे व बाहेर दोन पदरी काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. यातच गतवर्षी मांजरा नदी जवळ या कामाला सुरुवात झाली हे काम एका कंत्राटदाराने खोदकाम करून एक वर्षापूर्वी टाकले यावर मेघा कंपनी ने कसेबसे हे काम उपजिल्हा रुग्णालय या पर्यंत केले . याच रोडला लगत असलेली साई नगर वसाहत मोठी आहे. या वसाहतीत जवळपास ६५ कुंटूब राहत आहेत . या रोडवर जाण्यासाठी साईनगर वासियांना तारेवरची कसरत करावी लागत आहे साईनगर चा रस्ता व कंत्राटदाराने बनवलेला राज्य महामार्ग यामधील उंची जवळपास पाच ते सात फुटाणे उंच असून यावर चढ-उतार करण्यासाठी कंत्राटदाराने पर्यायी मार्ग हीसुद्धा केला नसल्याने नागरिकांना याचा त्रास होत आहे साई नगर गेट ते राज्य महामार्ग असा एकूण दोनशे फुटाचा रस्ता सुद्धा या कंत्राटदाराने न केल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागत आहे .याबाबत येथील रहिवाशांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जालना तसेच तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांना याबाबतचे निवेदन देऊन हा रस्ता पंधरा दिवसात न झाल्यास साईनगर मधील रहिवाशी लोकशाही पद्धतीने आंदोलन करतील असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे. या निवेदनावर साईनगर हाऊसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष संजय देवडा सचिव विलास मुळीक, यशवंत हारकर ,सचिन एरंडे ,चंद्रकांत दशवंत, प्रशांत सलगरे, सूर्यकांत वाघमारे, जयपाल शिंदे, भागवत मोरे, सुशिल सोनी, नानासाहेब कवडे,बाबासाहेब कांबळे आदी राहिवांशांच्या सह्या ओहत.




 
Top