Views
*भातागळी मोड येथील संत मारूती महाराज बहुउदेदेशीय सामाजिक संस्थाच्या आश्रम शाळेत हिंदू ह्र्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे कोवीड विलगिकरण कक्षाचे उदघाटन आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


लोहारा तालुक्यातील भातागळी मोड येथील संत मारूती महाराज बहुउदेदेशीय सामाजिक संस्थाच्या आश्रम शाळेत हिंदू ह्र्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे कोवीड विलगिकरण कक्षाचे उदघाटन आ.ज्ञानराज चौगुले व तहसीलदार संतोष रुईकर, नागन्ना वकील यांच्या हस्ते दि.26 मे 2021 रोजी करण्यात आले. कानेगाव, भातागळी, कास्ती या गावासह परिसरातील कोरोना बाधित रुग्णासाठी कानेगाव सरपंच नामदेव लोभे यांच्या पुढाकाराने विलगिकरण कक्ष उभारण्यात आले. आ.ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांनी विलगिकरण कक्षासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून दिले. किरण गायकवाड यांनी विलगिकरण कक्षासाठी 20 बेड उपलब्ध करून दिले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कठारे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, संत मारूती महाराज बहुउदेदेशीय सामाजिक संस्था अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष बालाजी मेनकुदळे, शिवसेना उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, शिवसेना लोहारा तालुका प्रमूख मोहन पनुरे, भातागळी संरपच दत्ता हजारे, कास्ती बु संरपच परवेझ ताबोळी, कास्ती (खु) संरपच सागर पाटील, कानेगाव उपसरपंच आशा कदम, माजी नगरसेवक अभिमान खराडे, ग्रामविकास अधिकारी एम एस भिल्ल, बालाजी लोभे, नवनाथ भारती, बाळू हिडोळे, यशवंत माने, वंदना कदम, शकुंतला कदम, नारायण लोभे, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
 
Top