Views


*मोदी सरकारच्या सातव्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपाचे गावोगावी कोरोनासंबंधी सेवाकार्य - जिल्हाध्यक्ष नितीन काळे*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी आघाडीच्या केंद्र सरकारला दि. 30 मे रोजी सात वर्षे पूर्ण होत असून त्या दिवशी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, यांच्या सुचनेनुसार भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आ.सुजीतसिंह ठाकूर, आ.राणाजगजिसिंह पाटील, यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यामधील गावांमध्ये कोरोना निवारणासाठी सेवाकार्य करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली स्थिती ध्यानात घेता कोणताही उत्सव होणार नाही, असेही ते म्हणाले. जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सांगितले की, उस्मानाबाद जिल्ह्यातील गावांमध्ये दि. 30 मे रोजी भाजपाचे कार्यकर्ते भेट देतील. जिल्हातील गावांमधील आशा सेविका आणि कोरोनाच्या साथीचा सामना करणाऱ्या कोरोना योध्यांचा पक्षातर्फे सत्कार करण्यात येईल. गावामध्ये भाजपाचे कार्यकर्ते कोरोनासंबंधी सेवाकार्य करतील. त्यामध्ये कोविड आजारात डॉक्टर आणि स्टाफ अंत्यसंस्कार करणारे योध्ये आशा कार्यकर्ते, कोविड योध्ये, कोविड सेन्टर मध्ये काम करणारा स्टाफ, हया काळात अन्न दान करनारे व्यक्ती व संस्था तसेच मोफत अंबुलन्स देणा-या संस्था, ऑक्सिजन व ऑक्सिजन पुरवठा करना-या संस्था यांना मदत व अनुषंगीक साहित्य देणे. आई-वडील मृत्यु पावल्यामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या 12 वी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. ते म्हणाले की, जिल्ह्यातील भाजपाचे सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह सर्व कार्यकर्ते सेवाकार्यात सहभागी होतील. पक्षातर्फे कोरोनाच्या संकटात सातत्याने सेवाकार्य चालू आहे. पक्षातर्फे ३० मे चा दिवसही विशेष सेवाकार्य करून साजरा करण्यात येणार आहे. कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करून आणि प्रशासनाला सहकार्य करून हा उपक्रम होईल. त्यांनी सांगितले की, भाजपाच्या युवा मोर्चा, महिला मोर्चा, किसान मोर्चा, एससी मोर्चा व अशा सर्व मोर्चांचे कार्यकर्ते दि.30 रोजी रक्तदान शिबीरांचे आयोजन करणार आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व शहरांमध्ये सेवावस्त्यांमध्ये विशेष सेवाकार्य करण्यात येईल. ते म्हणाले की, मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल नुकतीच पक्षाची राज्यस्तरीय ऑनलाईन बैठक झाली. त्या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार यंदा मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष सेवाकार्य करण्यात येईल.
 
Top