Views







*युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांनी लोहारा शहरातील आय.टि.आय कॉलेज येथील कोविड सेंटरला भेट देऊन रुग्णांची संख्या, सोयी-सुविधा औषधोपचार याची पहाणी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


लोहारा शहरातील ग्रामीण रूग्णालय अंतर्गत चालु असलेल्या आय.टि.आय कॉलेज येथील कोविड सेंटरला युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांनी भेट देऊन रुग्णांची संख्या, सोयी-सुविधा औषधोपचार याची पहाणी केली. तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर, नगर पंचायतचे अधिकारी,रुग्ण व नातेवाईक यांच्याशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली. यावेळी कोविड केअर सेंटरला असलेल्या रुग्णांची विचारपूस करत त्यांना धीर दिला. त्यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा, औषध उपचार, जेवण, स्वच्छता, आदी सोयी सुविधा याबाबत विचारपुस केली. आमदार.ज्ञानराज चौगुले यांनी सांगितल्या प्रमाणे आरोग्य यंत्रणा व रुग्णालय वैद्यकीय अधिकारी व नगरपालिका अधिकारी यांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याबाबत सूचना केल्या. यावेळी वैद्यकिय अधिक्षक डॉ.गोविंद साठे, लोहारा नगरपंचायतचे कार्यालयीन अधिक्षक जगदिश सोंडगे, खंडु शिंदे, कमलाकर मुळे, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

 
Top