Views
*युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे यांच्या यांच्या वतीने लोहारा शहरातील प्रभाग क्रं.7 मध्ये निर्जंतुकिकरण फवारणी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लोहारा युवासेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे यांनी शहरातील प्रभाग क्रं.7 मधील प्रत्येक घरा घरात, मुख्य रस्ता, नाली, सार्वजनिक ठिकाणी सर्व परिसरात ट्रॅक्टर द्वारे फॉगिंग मशीनने निर्जंतुकिकरणासाठी फवारणी केली. शहरातील प्रभाग क्रं. 7 मध्ये सध्या तरी ऍक्टिव्ह कोरोना बाधित रुग्ण नाही. तरी विहीत वेळेत निर्जंतुकीकरण फवारणी करण्याकडे युवासेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे यांनी विशेष लक्ष दिले आहे. प्रभागातील वर्दळ असणाऱ्या किराणा दुकाने, खाजगी दवाखाने यासह सार्वजनिक ठिकाणी ही सोडियम हायपोक्लोराईडची निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. स्थानिकांनी या फवारणीचे जोरदार स्वागत व सहकार्य केले. नागरीकांच्या आरोग्य रक्षणासाठी कोरोना विषाणू मुक्त वातावरण व अंगण होण्यासाठी व घरात प्रवेश करताना अंगण व रस्त्यावरील विषाणू घरात जाऊ नये यासाठी आ.ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण यांच्या सूचनेनुसार प्रभागातील घरे, अंतर्गत रस्ते, आंगणामध्ये ही फवारणी करण्यात येत असल्याचे श्रीकांत भरारे यांनी सांगितले.
 
Top