Views



*सास्तुर येथे 20 विलगीकरण कक्षाचे उद्घाटन शिवेसेना युवा नेते किरण गायकवाड यांच्या हस्तेे* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


 शिवसेना, स्पर्श रूग्णालयाच्या पुढाकारातून तालुक्यातील सास्तूर येथे 20 बेडचे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहे. युवा नेते किरण गायकवाड यांच्या हस्ते विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. मागील आठवडाभराच्या काळात सास्तूर गटातील सालेगाव, तावशीगड, मुर्शदपूर, उदतपूर, कोंडजीगड, राजेगाव, रेबे चिंचोली, होळी, एकोंडी आदी गावात 50 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. रूग्णांची संख्या वाढत असल्याने लोहारा तालुक्यातील कोविड सेंटरवर अधिक भार पडत असून रूग्णांचीही गैरसोय होत आहे. याबाबीचा विचार करून आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना व स्पर्श रूग्णालयाच्या सहकार्यातून 20 बेडचे विलगीकरण कक्ष सुरू केले आहे. तसेच सास्तूर गटातील प्रत्त्येक गावात शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांची कोरोनाविषयक लक्षणे तपासण्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स टीमची स्थापना करण्यात आली. युवा नेते गायकवाड यांच्या हस्ते विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्पर्श रुग्णालयाचे समन्वयक डॉ.रमाकांत जोशी, मुरली पवार, बालेपीर शेख, लायक कादरी, गहिनीनाथ देशमुख, शाहेबाज मुल्ला, मोहन नारायणकर, वसीम कादरी, प्रदीप मोरे, ग्रामसेवक गोरे, मंडळ अधिकारी कोकणे, महम्मद बागवान, साजिद शेख, विनायक बारकुले, गोविंद कोळी, आदी उपस्थित होते.

 
Top