Views





*जागजीचे पोलीस पाटील सुभाष कदम यांचा निराधाराला आधार ;हपोटची मुले वडिलांचा सांभाळ करत नसल्याने करणार वृद्धाआश्रमात दाखल*

उस्मानाबाद / प्रतिनिधी

 उस्मानाबाद तालुक्यातील खेड येथील पांडुरंग देवबा आवटे (वय70) यांना 2 मुले व 3 मुली असून यापैकी कोणतेही अपत्य सांभाळायला तयार नाहीत. त्यामुळे पांडुरंग आवटे हे गावोगावी भटकंती करीत आहेत. जागजी ता, उस्मानाबाद येथे हे वृद्ध 2 दिवसापासून आहेत. शुक्रवारी दि, 14 मे रोजी जागजीचे पोलीस पाटील सुभाष- कदम हे जागजीला गेले होते. कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याने जागजीत 7 मे 15 मे कालावधीत जनता करफू लावण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस पाटील कदम हे दररोज जागजी गावाला भेट देत आहेत. शुक्रवारी जागजी-आरणी रस्त्यावर पांडुरंग आवटे हे वृद्ध झोपलेले दिसून आले, चौकशी केली असता सकाळपासून पाणी, जेवण केले नसल्याचे सांगितले, उपसरपंच वैजिनाथ सावंत यांनी पुरण पोळी, आमरस असा जेवणाचा डबा दिला, नाना भीमराव सावंत यांनीही जेवणाची सोय केली. पोलीस पाटील कदम यांचे गौडगाव ता, बार्शी येथील फेसबुक मित्र राहुल भड हे वृद्धआश्रम चालवितात अशी माहिती मिळाली होती, त्यांच्याशी संपर्क साधून पांडुरंग आवटे यांची माहिती सांगितली, त्यांनी वृद्ध आश्रम येथे दाखल करून घेण्यासाठी संमती दिली, शनिवारी दि‌.15 मे रोजी खेडचे पोलीस पाटील पती बिभीषण गवाड व सुभाष कदम हे दोघे आवटे यांना घेऊन गौडगाव येथे घेऊन गेले. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, असे म्हटले जाते, आजच्या कलीयुगात पोटची मुले जन्मदात्यांचा सांभाळ करताना दिसत नाहीत. परदेशात दरवर्षी लाखो पॅकिंज घेऊन नोकरी करणारे महाराष्ट्रात कमी नाहीत, आई, वडिलांचा मृत्यू झाल्यास त्यांना अंतिम दर्शन घेण्यासाठी वेळ नाही, अशी अनेक उदाहरणे पहावयास मिळत आहेत. दारात लाखो रुपये किमतीचे कुत्रे पाळून त्या कुत्र्याला मोठ्या किमतीची बिस्किटे खाऊ घालतात पण जन्मदात्यांचा सांभाळ करत नाहीत, यालाच तर कलीयुग म्हणतात.
 
Top