Views
*आ.ज्ञानराज चौगुले व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांचा लोहारा तालुक्यातील विविध गावांचा दौरा*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उमरगा लोहारा तालुक्याचे आ.ज्ञानराज चौगुले व उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी दि.18 मे 2021 रोजी लोहारा तालुक्यातील विविध गावांचा दौरा करून आरोग्यविषयक सोयी सुविधांचा आढावा घेतला. या दौऱ्यात लोहारा तालुक्यातील जेवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या लसीकरणाची पाहणी, जेवळी येथील शिवसेना विलगीकरण कक्षाची पाहणी, फणेपूर येथे स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोबाईल युनिटची पाहणी, आष्टा का., अचलेर व उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथे शिवसेना व संबंधित ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येकी 20 बेड्सच्या विलगिकरण कक्षाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना युवा नेते किरण गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हणमंत वडगावे, गटविकास अधिकारी सोपान अकेले, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, जगन पाटील, लोहारा पं.स.चे माजी सभापती सिद्रामप्पा दुलंगे, माधव पाटील, आष्टा का.चे माजी सरपंच सुल्तानपुरे, अमोल सोमवंशी, केसरजवळग्याचे सरपंच अमोल पटवारी, प्रदीप मदने, सुरेश दंडगुले, नामदेव बिराजदार, शिवराज चिनगुंडे, यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी, शिवसैनिक उपस्थित होते.
 
Top