Views




*लोहारा शहरातील कोव्हीड सेंटर येथील रुग्णांना व कर्मचाऱ्यांना हाजी शब्बीर अहेमद अन्सारी बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शाकाहारी व मांसाहारी जेवन वाटप*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह व आय.टी.आय कोव्हीड सेंटर येथील 220 रुग्णांना व कर्मचाऱ्यांना हाजी शब्बीर अहेमद अन्सारी बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शाकाहारी व मांसाहारी जेवन वाटप करण्यात आले. या जेवण वाटपाच्या कार्यक्रमासाठी संस्थेला आथिर्क मदत शिवसेना उप तालुकाप्रमुख अमिन कुरेशी, सलिम कुरेशी, बाबा कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते महादेव धारूळे संस्थेचे अध्यक्ष महेबुब फकिर, प्रशांत काळे आदिनी आर्थिक मदत केली. हे जेवण वाटप करण्याचा हेतू मदत नसुन कर्तव्य म्हणून घेण्यात आले. रुग्णाची प्रकृती लवकर सुधार व्हावा व रोगप्रतिकार शक्ती वाढावी व लवकर बरे व्हावे म्हणून मांसाहरी जेवण वाटप करण्यात आले. यावेळी डॉ.राजु गायकवाड, तुळजापुर शिवसेना उप तालुकाप्रमुख शंकर लोभे, रफिक पठाण, हाजी आमिन सुंबेकर, जाकेर करेशी, सादिक फकिर, असलम सय्यद, इरफान सय्यद, हानमंत भावजी, हमिद शेख, अमिर शेख, अफताब कुरेशी, आदि उपस्थित होते.
 
Top