Views
*उस्मानाबाद शहरात सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करत छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी व रक्तदान शिबीर संपन्न*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भारतीय जनता युवा मोर्चा यांच्यावतीने उस्मानाबाद शहरातील जिजाऊ चौक येथे सोशल डिस्टंन्स राखत छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पोलीस उपनिरीक्षक सानप (आनंदनगर ) व भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांच्या हस्ते पुष्पहार वाहून, पुजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी कोरोना काळात अहोरात्र जनतेची सेवा करणारे पोलीस दलातील कर्मचारी तसेच जिजाऊ चौक येथील रिक्षा युनियन, व्यापारी संघ तसेच बार्शी नाका परिसरातील नागरिकांना मास्क, सॅनिटाइजर वाटप करण्यात आले. यावेळी युवा नेते प्रीतम मुंडे, महेश बागल, संदीप इंगळे, पवन सूर्यवंशी, कुणाल व्हटकर, शुभम मुंडे, व्यंकटेश दीवाने, दादा देशमुख, प्रसाद पाटील, आसिफ भाई, विकी उंबरे, कृष्णल वाघमारे, प्रतीक पवार, संकेत बागल, अथर्व जाधव, रवी वडणे, यांच्यासह शिवशंभू भक्त व भारतीय जनता युवा मोर्चा सहकारी उपस्थित होते.
-----------------------------------------------------------------------
रक्तदान करून महापुरुषांना अभिवादन
संताजी सेना, महाराष्ट्र शाखा उस्मानाबाद व सहयाद्री ब्लड बँक उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी महात्मा बसवेश्वर महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिराचे उदघाटन भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले‌. या प्रसंगी सचिन राऊत, डॉक्टर शशिकांत करंजकर, प्रदीप पोंदे, संताजी सेना चे प्रदेशाध्यक्ष श्रीराम मुंबरे, मराठवाडा संघटक भुपेश भांडेकर, जिल्हाध्यक्ष दीपक नाईक, कार्याध्यक्ष नागेश निर्मले, उपाध्यक्ष उमाकांत देशमाने, हरीश निर्मले, तालुकाध्यक्ष कैलास अडसुळे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top