*कोवीडची लस न देता पोलीसानी मारहाण केल्याबद्दल आवाज उठवणार - भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
दिनांक 12/05/2021 रोजी कोवीड -19 ची दुसऱ्या लसीचा डोस घेण्यासाठी उस्मानाबाद शहरातील नागरिक प्रदिप आण्णासाहेब सुरवसे हे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रांगेत उभे उसतांना प्रशासनाच्या ढिसाळ कारभार व नियोजनाचा असलेला अभाव यामुळे उस्मानाबाद शहरातील जेष्ठ नागरिक वय 45 वर्षावरील सव्याधी असलेले लोक कोवीडच्या दुसऱ्या डोस साठी पहाटे पासून तिष्ठत उभे असतांना झालेल्या गोंधळात विनाकारण रांगेतील प्रदिप आण्णासाहेब सुरवसे यांना पोलीस कर्मचारी सुनिल कल्याण कोळेकर यांनी मारहाण केली. लस न देता लाठीमार सहन करण्याची वेळ जिल्ह्यातील नागरिकांवर आली. प्रदिप सुरवसे यांनी माझ्या दोन्ही पायाचे ऑपरेशन झाले आहे असे सांगीतले असतानाही सदरची मारहाण झाली. यामध्ये प्रदिप सुरवसे हे जखमी झाले. त्यांनी याबाबत पोलीस अधिक्षक व जिल्हधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर दवाखान्या उपचार करण्यात आला आहे. सदरची घटना कळताच भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह पदाधिकाज्यांनी प्रदिप सुरवसे यांची भेट घेवून विचारपूस केली सर्व घटना समजून घेवून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणार व संबंधीत कर्मचाऱ्यावर कार्यवाही करावी असे प्रशासनास मागणी करणार असे ही सांगीतले व प्रदिप सुरवसे व त्यांच्या कुटुंबीयांना धिर दिला. कोरोनाच्या महामारीत असे प्रकार घडतात याचे जनतेला आश्चर्य वाटते अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटटणीस अॅङ.नितीन भोसले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, प्रवीण सिरसाठ, मोहन कुलकर्णी, सुनिल गवळी, रोहीत देशमुख उपस्थित होते.