Views
*लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर मंदिरात सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करत महात्मा
बसवेश्वर जयंती साजरी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 बाराव्या शतकातील समाजसुधारक, लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची जयंती अक्षय तृतीय च्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. मात्र यावर्षी ही साऱ्या जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणू मुळे महात्मा बसवेश्वर यांची ८९० वी जयंती घरोघरी साजरी करण्यात आली.शहरातील महात्मा बसवेश्वर मंदिरात सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करत मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत नंदीध्वजरोहण व जन्मोत्सव निमित्त पाळणा कार्यक्रम घेण्यात आला. महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त मंदिरात विधिवत पुजा करण्यात आली. यावेळी नागन्ना वकील यांच्या हस्ते नंदीध्वजरोहण करण्यात आले. यावेळी शंकर अण्णा जट्टे, बालाजी मेणकुदळे, शिवा स्वामी, इरापा फावडे, हरी लोखंडे, माधव वकील, उपस्थित होते. अक्का महादेवी महिला भजनी मंडळाच्या निर्मला शिवलिंग स्वामी, सुरेखा शिवशंकर जट्टे, शैला उमाशंकर जट्टे यांनी बसवेश्वर जन्मोत्सवानिमित्त मंदिरात पाळणा केला. यावेळी श्रीशैल्य स्वामी, शशांक पाटील, विर फावडे, श्रीशैल्य मिटकरी,महेश कुंभार,प्रसाद मिटकरी, सचिन तोडकरी, गणेश कमलापुरे, विशाल स्वामी उपस्थित होते. कोरोना कोविड १९ चा संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेत प्रशासनाला सर्व तो परी सहकार्य करीत बसव भक्तांनी घरातच महात्मा बसवेश्वर जयंती साजरी केली.
 
Top