Views


*कोरोना संसर्गामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्ण व नातेवाईकांसाठी लोहारा शहरातील कोविड सेंटर येथे काँग्रेसच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नियोजनात दररोज 225 डब्बे अन्नदान पोहच*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लॉक डाऊनमुळे जेवणाची अडचण लक्षात घेऊन काँग्रेसच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नियोजनातून व मुरुम बाजार समितीचे सभापती बापुराव पाटील व जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह व आय.टी. काय कॉलेज या दोन कोरोना केंद्रातील रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना काँग्रेसचे कार्यकर्ते हे दररोज 225 डब्बे अन्नदान पोहच करीत आहेत. यामुळे रुग्णांसह नातेवाईकांना मोठा आधार मिळत आहे. सध्या कोरोनाने उमरगा-लोहारा तालुक्यात थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे या रुग्णांना आधार देण्यासाठी व सर्वसामान्य कुटुंबातील कोरोना बाधीत रुग्णांना दिलासा देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कोरोना रुग्णांना मदत केंद्र सुरू केले. कोरोना सेंटरमध्ये व परिसरात रुग्ण व नातेवाईकांचे जेवण्यासाठी होणारे हाल लक्षात घेऊन काँग्रेसच्या वतीने दि.1 मे 2021 पासून लोहारा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह व आय.टी. आय कॉलेज या दोन कोरोना केंद्रातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक असे एकुण 225 डब्बे दररोज मोफत अन्नदान केले जात आहे. मुरुम येथे आचाऱ्यामार्फत पहाटेपासून दर्जेदार जेवण बनवून ते दुपारी जेवणाचे पार्सल डब्बे थेट वाहनातून कार्यकर्ते कोरोना सेंटर वर पोहचवत आहेत. मुरूम बाजार समितीचे सभापती बापुराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते शरण पाटील हे अन्नदानाचे काम सुरळीत ठेवण्यासाठी लक्ष देऊन पाहणी करतात. दि.13 मे 2021 रोजी हे अन्नदान काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेराव, काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील, लोहारा पंचायत समिती सभापती हेमलता रणखांब, उपसभापती व्यंकट कोरे, डॉ.बाळासाहेब भुजबळ, डॉ. शेख, शहराध्यक्ष के.डी.पाटील, युवक शहराध्यक्ष हरी लोखंडे, विठ्ठल वचने-पाटील, दत्तात्रय गाडेकर, तानाजी माटे, कांबळे, उद्धव रणखांब, मुरूम बाजार समितीचे संचालक विजय सोनकटाळे, तुंगावचे उपसरपंच भालचंद्र लोखंडे, यांच्यासह आदींच्या हस्ते रुग्ण व नातेवाईकांना अन्नदान वाटप करण्यात आले. काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जेवणाच्या डब्ब्यामुळे रुग्ण व नातेवाईकांना मोठा आधार मिळाला आहे.
 
Top