Views





*शिवसेना युवा नेते प्रमोद बंगले यांच्या वतीने सामाजिक भावना जपत लोहारा शहरातील प्रभाग क्रं.8 मध्ये निर्जंतुकिकरण फवारणी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला



कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरीकांच्या आरोग्य रक्षणासाठी कोरोना विषाणू मुक्त वातावरण व अंगण होण्यासाठी व घरात प्रवेश करताना अंगण व रस्त्यावरील विषाणू घरात जाऊ नये यासाठी आ.ज्ञानराज चौगुले व शिवसेना युवा नेते किरण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवा नेते प्रमोद बंगले यांनी दि.26 मे 2021 रोजी सामाजिक भावना जपत लोहारा शहरातील प्रभाग क्रं.8 मधील प्रत्येक घरा घरात, मुख्य रस्ता, नाली, सार्वजनिक ठिकाणी सर्व परिसरात ट्रॅक्टर द्वारे फॉगिंग मशीनने निर्जंतुकिकरणासाठी फवारणी केली. प्रभागातील वर्दळ असणाऱ्या किराणा दुकाने, खाजगी दवाखाने यासह सार्वजनिक ठिकाणी ही सोडियम हायपोक्लोराईडची निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. स्थानिकांनी या फवारणीचे जोरदार स्वागत व सहकार्य केले. यावेळी शिवसेना युवा नेते प्रमोद बंगले, माजी उपसरपंच व्यंकट घोडके, बाबुलाल खुटेपड, इब्राहिम शेख, आदि, उपस्थित होते.
 
Top