Views
*बेंबळी येथील जिल्हा परिषद शाळेत लोकसहभागातून आयसोलेशन सेंटर लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांवर राहणार देखरेख*
 
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत दक्षता फाउंडेशन, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व लोकसहभागातून आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. याचे उद्धाटन मान्यवरांच्या हस्ते दि.11 मे 2021रोजी करण्यात आले. दक्षता फाउंडेशन, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा परिषद माध्यमिक प्रशालेत आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. याचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सभापती बालाजी गावडे, सरपंच वंदनाताई कांबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छींद्र शेंडगे, उपसरपंच नितिन इंगळे, दक्षता फाउंडेशनचे अध्यक्ष गालिब पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन फाउंडेशनचे विश्वस्थ उपेंद्र कटके यांनी केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी एम.बी.करपे, ग्रामपंचायत सदस्य नवाब पठाण, मोहन खापरे, राजाभाऊ नळेगावकर, दक्षता फाउंडेशनचे उपाध्यक्ष नितिन खापरे, सचिव शामसुंदर पाटील, सहसचिव गुड्डू सोनटक्के, कोषाध्यक्ष सुनिल वेदपाठक, विश्वस्थ गोविंद पाटील, नंदकुमार मानाळे, रणजित बरडे, आतिक सय्यद, भाजपचे नेते राजाभाऊ सोनटक्के, नवनाथ कांबळे, विठ्ठलवाडीचे उपसरपंच अंकुश तानवडे, पांडूरंग पवार, अजित खापरे, निळकंठ रेडेकर, रोडे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होेते.
----------------------------------------------------------------------
फाउंडेशनकडून बेडची व्यवस्था 
गतवर्षी दक्षता फाउंडेशनच्या वतीने काेविड केंअर सेंटरसाठी 25 बेडची व्यवस्था करण्यात आली होती. गतवेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत कोविड सेंटरचे उद्धघाटन करण्यात आले होते. आता तेच बेड, गाद्या, पाण्याची टाकी आयसोलेशन सेंटरसाठी वापरण्यात येत आहेत. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायत निधीतून वीज व अन्य व्यवस्था उपलब्ध केली आहे. आयसोलेशन सेंटरमध्ये केवळ नॉन सिम्टेमेटीक कोरोना रुग्ण ठेवले जाणार आहेत. नागरिकांना कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड टेस्ट करून घ्यावी. लक्षणे नसल्यास त्यांना आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. अधिक त्रास असल्यास उस्मानाबादला पाठवण्यात येणार आहे. तसेच सेंटरमध्ये ठेवलेल्या रुग्णांनी दररोज नियमित तपासणी करण्यात येईल.
 
Top