Views
*सामाजिक बांधिलकी जपत लोहारा तालुका मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय व कोविड रुग्णांना अत्यावश्यक असलेले 2 लाख 40 हजार रुपयाचा औषध साठा वाटप*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 कोरोना चा प्रादुर्भाव अधिकाधिक वाढत आहे. कोरोना नंतर काळी बुरशीच्या आजाराची (म्युकरमायकोसिस) लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस, महसुल, यांच्यासह सर्वच शासकीय यंत्रणा दिवस- रात्र जनतेची सेवा करीत आहेत. याबाबत गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक भावना जपत एक कर्तव्य समजुन लोहारा तालुका मेडिकल असोसिएशन च्या वतीने शहरातील ग्रामीण रुग्णालय व कोविड रुग्णांना अत्यावश्यक असलेले सुमारे 2 लाख 40 हजार रुपयाचा औषध साठा उपलब्ध करून दिला आहे. समाजाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. आणि ती मेडिकल असोसिएशन च्या सर्व सहकार्याच्या मदतीने घडत आहे. मदत नसुन हे कर्तव्य आहे. जागतिक महामारीत सामाजिक बांधिलकेची जाणीव सर्वांनी ठेऊन रुग्णांना आधार देण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे लोहारा तालुका मेडिकल असोसिएशन अध्यक्ष भरत सुतार यांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालयाला या कोरोना च्या काळात ज्या औषधाची गरज भासत होती. ती औषधे उपलब्ध करून दिल्या बद्दल लोहारा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोविद साठे यांनी मेडिकल असोसिएशन चे आभार व्यक्त केले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोविद साठे, लोहारा तालुका मेडिकल असोसिएशन अध्यक्ष भरत सुतार, डॉ.हेमंत श्रीगिरे, डॉ. गुणवंत वाघमोडे, सोमनाथ माळी, अप्पा देवकर, प्रमोद बंगले, महेश खबाले, यशवंत कासार, बाबुराव पवार, विकास होंडराव, पाशुमिया मुजावर, दिपक मुळे, सचिन बिराजदार, अविनाश भुजबळ, कृष्णा घोडके, गणेश सारंग, विशाल सोमवंशी, विक्रम जावळे, जावेद मुजावर, गजानन बस्ते, गणेश हिप्परगेकर, निखिल माशाळकर, भाऊसाहेब देशमुख, शाहूराज चव्हाण, विशाल सोमवंशी, सोन्या वाघमोडे, सत्तेश्वर ढोबळे, सुमित फावडे, प्रवीण अभंगराव, पद्मसिह पाटील, महादेव सोलापुरे, खंडू सुल्तानपुरे, फय्याज शेख, विनोद माने, विशाल जावळे, विष्णू मुसळे, आदी, उपस्थित होते.
 
Top