Views


*जिल्हा विधिज्ञ मंडळ उस्मानाबाद यांच्या वतीने covid-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद जिल्हा विधिमंडळ यांचे वतीने विधिज्ञ, जिल्हा न्यायालयातील न्यायिक वर्ग, कर्मचारी यांचेसाठी कोविंड 19 प्रतिबंधित प्रतिबंधक लस लसीची सुरुवात दि‌.8 एप्रिल रोजी करण्यात आली. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे हे लसीकरण सुरू करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश एम.जी‌.देशपांडे, सत्र न्यायाधीश श्रीमती रॉय मॅडम, जिल्हा विधी मंडळाचे अध्यक्ष ॲड. नितीन भोसले, उपस्थित होते. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व आरोग्य विभाग उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली हे लसीकरण चालू आहे. यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ‌.वडगावे, लसीकरण कॉर्डिनेटर डॉ मिटकरी, आयुर्वेदिक महाविद्यालय लसीकरण अधिकारी डॉक्टर लिलके मॅडम यांचे सहकार्य लाभत आहे.हदेशभरात लसीकरण सुरू असताना आणखी काही लोकांशी संदर्भात भीती आहे, ही भीती दूर व्हावी व जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावे याकरिता जिल्हा विधिज्ञ मंडळ उस्मानाबाद यांनी पुढाकार घेऊन ही लसीकरण मोहीम सुरू केली आहे तरी जास्तीत जास्त विधिज्ञ कर्मचारी यांनी लसीकरण करून घ्यावे, असे आव्हान याप्रसंगी करण्यात आले‌. या कार्यक्रमास महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी उपाध्यक्ष ॲड.राम गरड, ॲड.निलेश बारखेडे, ॲड.अतुल देशमुख, ऍड. क्रांतिसिंह डेंगळे, ऍड.प्रवीण शेटे, ऍड.भाग्यश्री कदम, ऍड. अरुणा गवई, एड.आकांशा माने,एड.अश्विनी सोनटक्के, एड.पात्रुडकर, एड.तानवडे, एड.पारवे, एड.कुलकर्णी, उपस्थित होते.
 
Top