Views


*सारोळा येथे विद्युत डीपीचा शुभारंभ*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) येथे कृषी विद्युत डीपीचा सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांच्या हस्ते पूजन करून शुभारंभ करण्यात आला. सारोळा येथील बालपीरवाडी शिवारात विद्युत डीपीअभावी शेतकऱ्यांची मोठी गैरसोय सुरू होती. तसेच कमी दाबाने वीजपुरवठा आणि वारंवार डीपी नादुरूस्त होवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वखर्चातून डीपी उभारणीसाठी महावितरणकडे प्रस्ताव दाखल केला होता. हा प्रस्ताव तातडीने मंजूर होण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांन पाठपुरावा केला होता. त्यामुळे आता डीपीची उभारणी झाली असून कायारन्वितही झाला आहे. डीपी पूजनप्रसंगी वैभव पाटील, विलास कुदळे, प्रकाश गुरव, प्रमोद पाटील, बाळासाहेब जाधव, अनंतराव कठारे, नवनाथ माळी, शुभम गुरव आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
 
Top