Views
*टायगर ग्रुपचे अध्यक्ष अक्षय पवार व न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल संस्थापक तथा प्राचार्य शहाजी जाधव यांच्या वतीने लोहारा तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे वाटप*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील नागुर येथील टायगर ग्रुपचे अध्यक्ष अक्षय पवार व न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल लोहाराचे संस्थापक तथा प्राचार्य शहाजी जाधव यांच्या सयुंक्त विद्यमाने लोहारा तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे वाटप करण्यात आले. यावेळी स्कुलतर्फे अक्षय पवार यांना भारतमातेची प्रतिमा भेट देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अक्षय पवार म्हणाले की, कोरोणामुळे मागील वर्षभरापासून शासनाने " शाळा बंद व शिक्षण सुरू" हा उपक्रम राबवला आहे. आणि यासाठी ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी आणि स्वाध्याय सोडविण्यासाठी विद्यार्थ्याकडे एकतरी मोबाईल कींवा कॉम्पुटर असणे गरजेचे आहे. यासाठी टायगर ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी अतिशय माफक दरामध्ये कॉम्पुटर संच उपलब्ध करून देवून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार दिलेला आहे. याप्रसंगी अक्षय पवार, शहाजी जाधव, संतोष जाधव, सलीम मुल्ला, अजय पवार, रमेश वाघुले, सूरज झिंगाडे, बळीराम कोकणे, लाभार्थी विद्यार्थी प्रणिता वाघुले, गौरी झिंगाडे, संस्कृती जाधव, साक्षी कोकणे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
 
Top