Views


*रुईभर - गौडगांव - अनसुर्डा रस्त्यासाठी अखेर निधी मंजूर
माजी जि.प.सदस्य रामदास कोळगे यांच्या पाठपुराव्यास यश*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 उस्मानाबाद तालुक्यातील रुईभर - गौडगांव - अनसुर्डा या 8.5 किमी रस्त्याच्या कामास अखेर निधी मंजूर झाला आहे. प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेतून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजुर व्हावा यासाठी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी सतत पाठपुरावा केला होता. तब्बल आठ वर्षानंतर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असुन दि.01 एप्रिल 2021 रोजी या रस्त्यासाठी 767.51 लक्ष रुपयाचा निधी मंजुर झाल्याने तीन गावच्या ग्रामस्थांची अनेक वर्षापासुनची सुरु असलेली गैरसोय ही आता थांबणार आहे. रुईभर पाटी ते रुईभर गांव - गौडगांव - अनसुर्डा - अनसुर्डा शांतीनगर या रस्त्याची अनेक वर्षापासुन दुरवस्था आहे. 2013 पासुन सदरील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजुर करण्यात यावा म्हणुन श्री कोळगे यांनी महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था धाराशिव येथील कार्यालयाचे कार्यकारी अभियंता (प्रधानमंत्री ग्रामसडक योजना) यांना पत्रव्यवहार करुन प्रसंगी संस्था समक्ष भेटुन निधी मंजुरी साठी प्रयत्न केले. परंतु शासन निर्णयानुसार 2015 ते 2019 पर्यंत सदरील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्राधान्य क्रम ठरविण्यात आल्याने निधी मंजुर होण्यास अडसर निर्माण झाला होता. यावार्षी सदरील रस्त्याचा प्राधान्य क्रम आल्याने प्रधानमंत्री सडक योजनेतुन अखेर निधी मंजुर होवुन रस्ता दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे रुईभर - गौडगांव - अनसुर्डा ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे पुर्व मराठवाडा संपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांचे आभर मानले आहेत.
 
Top