Views


*गरुडझेप फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

हभप पांडूरंग महाराज गरूड यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानानिमित्त व गरुडझेप फाऊंडेशनच्या दुसऱ्या पर्दापण दिनानिमित्त राज्यस्तरीय समाजभूषण व कार्यगौरव पुरस्कार देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
उमरगा येथे प्रथमतः आशुतोष महाराज कदमापूरकर यांचे प्रवचन झाले व त्यानंनंतर पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र गोरे होते. तर
प्रमुख पाहुणे माजी पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, शांतिदुत परिवाराचे प्रदेश सरचिटणीस प्रा.युसुफ मुल्ला, गरुडझेप फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नरहरी उर्फ गणेश गरूड, अदि, उपस्थित होते. गरुडझेप फाऊंडेशनच्या वतीने आशुतोष महाराज यांना समाजभुषण, प्रा.युसुफमुल्ला यांना कार्यगौरव, हभप भीम महाराज सुर्यवंशी (सुप्रसिद्ध कीर्तनकार) यांना शांतिदुत परिवाराच्या वतीने सेवारत्न पुरस्कार देण्यात आले. हभप बालाजी महाराज बिराजदार, पोलीस नागेश गरूड, शीतल गरूड विरनाथ महाराज काळे, अभय रेणके, इंद्रजित दुबे, दत्तू वाकडे, माधव सोनजी , ज्ञानेश्वर गरूड, सर्प मित्र अनिल गरूड, तुकाराम गरूड, नागेश गोरे, विजय पाटील, नामदेव गरूड, आशा कार्यकर्त्या सुजाता स्वामी, सौ. सरस्वती दुधभाते यांचा कोरोनाच्या काळात सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. शेवटी हभप भीम महाराज सूर्यवंशी यांचे कीर्तन झाले व महाप्रसाद देण्यात आले. यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते.
 
Top